एक होती मिरची


सध्या दोन दिवस आजारी आहे. तेव्हा पडल्या पडल्या सहज सुचलेली ही गोष्ट. विशेष विचार वगैरे न करता लिहिलेली. 🙂

एक होती मिरची. म्हणजे मिरचीचे रोप. असेल ४-५ महिन्याची . तिच्या घरमालकाने रुजवलेल्या बीतून अंकुरलेली. तिच्या मालकाचा तिच्यावर खूप जीव. रोज संध्याकाळी घरी आल्यावर तिला पाणी द्यायचा. सगळ्याच बागेला द्यायचा पण हिच्याबर जास्तच जीव. कामाचा कितीही व्याप असेल तरी पाणी देणे कधी चुकायचे नाही. नुसते पाणीच नाही तर खुरपणी करायचा खत द्यायचा. बाकी रोपांना कीड लागायची. पण ह्या मिरचीला त्रास द्यायची कोणाची काय बिशाद! अस्सल कोल्हापुरी लवंगी मिरचीचं  पाणी ते. पाणी देऊन झालं की हिला रोज गोंजारायचा. कामात कधी वैताग आला तर हिच्यापुढे मन मोकळे करायचा.

मालकाच्या मायेने मिरची मोहरून जायची. भरभरून मिरच्या लागायच्या. मालकाला तर मिरचीची फारच हौस. रोज जेवणात लागायची. घरची तिखट जाल मिरची मिटक्या मारत खायचा. मिरची ला धन्य धन्य वाटायचं.

पण एकदा काय झालं, मालकाचं डोकंच फिरलं. आणि त्याने बागेत ठिबक सिंचन लावलं. एक बटन दाबलं की आख्या बागेला पाणी! किती वेळ वाचायचा. आधी सर्व झाडाना छान वाटलं. ठिबक सिंचनाचे तुषार मिरचीला पण सुखवायचे. पण त्यामुळे झालं काय की मालकाचं झाडांवरचं लक्षच उडालं. नुस्तं बटन दाबून मालक घरात जाई आणि थोड्यावेळाने बटन बंद करी. बागेत फिरण तर बंदच.

मिरचीला फार वाईट वाटलं. व्यवस्थित पाणी मिळूनसुद्धा मोहोर येईना झाला. मालकाला रोजची घरची  मिरची मिळेनाशी झाली. पण मालकाला काही कळेना! मिरचीचे दिवस भरले असेच त्याला वाटले. त्याला काय माहित कि त्या लवंगी मिरचीला मायेची गोडी लागली होती? खत पाण्यापेक्षा मायेला आसुसलेली होती? मालक मात्र माणसासारखा वागला. आपल्याच हातानी रुजवलेल्या मिरचीला त्याने ओल्या कचऱ्याचा  डबा दाखवला. पण मिरची मात्र मेल्यावर सुद्धा त्याला उपयोगी पडली. खताच्या रूपाने त्याच्या इतर झाडांना पोसू लागली.

Advertisements

14 thoughts on “एक होती मिरची”

 1. बापरे! ही पोस्ट वाचल्यावर असेच उद्गार बाहेर पडले. कितीही कृत्रिम-सोयी सुविधा आणल्या तरी मायेचा ओलावा असणे फारच गरजेचे आहे. अतिशय परिणामकारक पद्धतीने आणि मार्मिक शैलीत सध्याच्या जीवनशैलीवर भाष्य केलं आहे. छानच!

 2. “सगळ्या गोष्टीत ऑटोमेशन ” या विषयीची माझी (अर्थात ऑटोमेशन विरोधी) मतं मिरचीहूनही तीव्र आहेत. त्यामुळे प्रोफेशनल लाईफमधेही मतभेद होतात. ऑटोमेशन ९० टक्के ठिकाणी हवंय पण उरलेल्या १० टक्के ठिकाणी ते नकोच. इतकंच नव्हे तर ते अजिबात नको.. तिथे माणसाच्या आवाजाची, स्पर्शाची गरज आहे आणि तीच नजाकत आहे.

  म्हणून थोडक्यात खूप सांगणारी ही सिम्बोलिक गोष्ट आवडली. अगदी वादात उदाहरण म्हणून द्यायलाही खूप चांगली आहे.

 3. हम्म..राहून गेली होती वाटत ही पोस्ट वाचायची….अमेरिकेत काही दुकानात survey करतात की तुम्हाला automated check out हव की cashier …मी नेहमी cashier साठी मत देते….दोन मिनिटांच बोलण पण तरी फरक पडतो अस वाटतं…..

  1. अपर्णा
   खरंतर मी स्वतः Automation चा चाहता आहे 🙂 मला तर ते ऑटो चेकऔट खूप सोयीचे वाटायचे. इकडे ठिबक सिंचन लावल्यावर माझं बागेत जाणं कमी झाले त्यावरून मला ही गोष्ट सुचली.

   1. अच्छा पण तुम्हाला माहित आहे का?? झाडांना खरच पाणी आणि प्रेम दोन्ही द्यावं मग ती छान फुलतात असं मी बरेचदा वाचते ….आणि माझ्या स्वत:च्या झाडांबद्दल ते अनुभवलयही…:)

  1. विक्रम,
   ही गोष्ट का आणि कशी सुचली हे सांगता येत नाही. खरडली तेव्हा कोणाला आवडेल असे वाटत नव्हते. पण तुम्हाला आवडली आणि तसे कळवले त्याबद्दल आभारी आहे !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s