फ्रीज


सध्याच्या जमान्यात फ्रीज हा स्वयंपाकघरातील अपरिहार्य भाग झाला आहे. फ्रीज शिवाय जगणं मुश्कील वाटतं आजकाल. फ्रीज मुळे  नुसत्या बर्फाची किंवा थंड पाण्याचीच सोय झाली आहे असे नाही, तर फ्रीज आला म्हणून आठवड्याची भाजी एकदम आणता येऊ लागली. नाशिवंत गोष्टी जास्त काल टिकू लागल्या. पूर्वी १००-१५० लिटर चा फ्रीज पुरत असे, आता ४०० – ५०० लिटर फ्रीजपण अपुरा पडू लागलाय. अमेरिकेत तर फ्रीजचा पुरेपूर वापर होतो. तिकडे आमच्या ऑफिस मध्ये माझी एक अमेरिकन सहकारी होती. ह्या बाई वर्षातून फक्त दोन दिवस स्वयंपाक करायच्या आणि वेग वेगळ्या डब्यात तो भरून फ्रीजमध्ये गोठवायच्या! रोज रात्री एक डबा उघडून गरम करून खायचा. अमेरिकेत माझ्या बऱ्याच मित्रांकडे दोन दोन फ्रीज आहेत. एक फ्रीज नेहमीच्या वापरातील गोष्टी ठेवायला आणि दुसरा होलसेल मधून आणलेला माल साठवायला.

आता फ्रीज म्हटलं की त्याला वीज ही आलीच. आणि तशी बऱ्यापैकी वीज लागते. मोठ्या शहरात ठीक आहे, पण महाराष्ट्रातल्या असंख्य गावात ८-८ तास वीज नसते. तिकडे फ्रीज कसा काय चालवणार? आणि इन्व्हर्टर वर कितीकाळ चालवणार? पण तुम्हाला माहित आहे का, पूर्वीच्या काळी उष्णतेवर चालणारे फ्रीज असत. उष्णतेच्या प्रवाहाचे (heat transfer) सोपे तत्व वापरून हा फ्रीज चालायचा. पण वीजेच्या शोधानंतर  हे तंत्र मागे पडलं आणि विजेवर चालणारे फ्रीज लोकप्रिय झाले. मात्र उष्णतेवर चालणाऱ्या फ्रीजचा आता परत विचार करायला हवा. खासकरून भारतात, सूर्यापासून बरीच उष्णता निर्माण करता येईल. ती उष्णता वापरणारा फ्रीज तयार केला तर विजेची प्रचंड बचत करता येईल.

पण कोणत्याही उर्जेविना चालणारा फ्रीज बनवला तर? कल्पना अशक्य वाटते ना? गुजरातमधल्या कुंभाराने असा फ्रीज बनवला आहें. माठातल्या थंडगार पाण्यामागे जे तत्व आहें (evaporative cooling) तेच सामान्य तत्व वापरून मातीपासून बनवलेला फ्रीज म्हणजेच मिट्टी कूल. मनसुखलाल प्रजापती नावाच्या एका कुंभाराने बनवला. भाज्या आणि दूध साठवायला खूप उपयोगी पडेल असा हा फीज. गुजरातच्या खेड्यात लोकप्रिय झालाय. ह्या बद्दलची अधिक माहिती येथे मिळेल.

शिळेपाके न साठवता नुसत भाजीपाला दूध वगैरे गोष्टी साठवण्यापूर्ती आपली फ्रीजची गरज ठेवली, तर मिट्टीकूल सारखा उत्तम पर्याय नाही. मी तरी हा फ्रीज नक्कीच घेणार आहें.

Advertisements

10 thoughts on “फ्रीज”

 1. बर्फाचं मशिण… मी एक पाहिलं होतं . ब्रिटीश कालीन गेस्ट हाउस आहे मॉयल तिरोडी च्या साईटवर तिथे एक फार जुना फ्रिझ आहे उष्णतेवर चालणारा पण हल्ली तो बंद पडलाय..कसा दुरुस्त करायचा हे कोणालाच माहिती नाही.. ती साईट पण पाहिली. माहिती काही जास्त दिलेली नाही.कदाचित कॉपी होईल म्हणून असेल..

  1. महेंद्र,
   भारतात पूर्वी बरेच ठिकाणी हे उष्णतेवर चालणारे फ्रीज होते म्हणे. उष्णता निर्माण करायला एक विजेचा बल्ब असायचा. असा फ्रीज कुठे मिळाला तर कोणा mechanical engineer च्या सहाय्याने सौर उर्जेवर चालवता येतोय का पहायचे आहें. अमेरिकेत हे फ्रीज अजून मिळतात. जहाज, आरव्ही मध्ये बसवायला.

   1. मी जो पाहिला होता त्या मधे फ्रिझच्या खाली एक स्पिरिटचा दिवा लावावा लागायचा. त्या साठी एक खास जागा होती दिलेली. मॅंगनीझ ओअर इंडीया लिमिटेडच्या गेस्ट हाउस मधे होता हा फ्रिझ.
    जहाजा मधले फ्रिज हल्ली इलेक्ट्रिकचे असतात. एक मोठा जनरेटर असतोच, त्यामुळे विजेवर चालणारे घेणं सोपं पडत असावं.

   2. जर त्या फ्रीज ला स्पिरीटचा दिवा पुरत होता, त्या अर्थी सौर उर्जेवर सुद्धा चालायला हरकत नसावी. सोलर हिटर ने पाणी गरम करून त्या गरम पाण्याचा पाईप स्पिरीट दिवा जो भाग गरम करतो तिकडून फिरवला तर फ्रीज कितपत चालेल हे पाहायला हवे.
    जहाजातल्या फ्रीजची तुम्हालाच जास्त माहिती 🙂 मी वाचलेल्या माहिती नुसार अमेरिकेत प्रोपेन वर चालणारे फ्रीज खासगी बोटी आणि आरव्ही बस मध्ये विकतात म्हणे.

  1. फ्रीजवर प्रयोग तर करायचा आहे, पण त्यासाठी जाणकार लोकांची गरज आहे. माझ्या डोक्यात फक्त कल्पना आली पण ती प्रत्यक्षात उतरवायचे कसब नाही.
   पण घरात सोलर हिटर आणि सोलर वर चालणारा इन्व्हर्टर लाऊन थोडीफार सौरउर्जा वापरण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s