नेट संस्कृती


पूर्वी मुंबईत जेव्हा चाळ संस्कृती होती, तेव्हा प्रायव्हसी नावाची गोष्टच नव्हती. एखाद्या कुटुंबाची सुखंदुःखं अख्ख्या चाळीला माहित असत. अगदी एकमेकांच्या पगारापासून  पोस्टातल्या ठेवींपर्यंत सर्व गोष्टी माहित असत. नंतर आली बंदिस्त फ्लॅट संस्कृती. घरांच्या दारांपासून मनातील कवाडा पर्यंत सगळे दरवाजे बंद. झाकली मुठ सव्वा लाखाची. शेजाऱ्यांची कमाई सोडा, त्यांचे चेहेरे पण माहित नाही अशी परिस्थिती. पण ह्या बंदिस्त संस्कृतीत संगणक आणि इंटरनेट ह्यांचा चंचूप्रवेश करता झाला आणि नकळत गुगल, फेसबुक आणि ट्विटरनी व्यक्तिगत माहितीचा बाजारच मांडला. पूर्वीची चाळ संस्कृती, तर ही आताची “वाचाळ” संस्कृती अशी गत झाली आहे.

त्या ट्विटर च्या जन्मदात्याला स्वप्नात पण वाटले नसेल की त्याचे हे ऑनलाईन बाळ काही लोकांचा काळ ठरेल. ह्या ट्विटरचा थिरूर आणि मोदींना बसलेला दणका जगजाहीर आहेच. काल अजून एक बातमी वाचली. अमेरिकेत एका बाईना त्या “शृंगारिक” कथांचा   ब्लॉग  लिहितात हे त्यांच्या कंपनीत कळले म्हणून नारळ मिळाला. ह्या बाई टोपण नावाने स्वतःचे शृंगारिक अनुभव लिहित असत. स्वतःचे शृंगारिक अनुभव लिहिणे हे नैतिक की अनैतिक हा मुद्दा बाजूला ठेवू. ह्या बाई हे उद्योग घरी बसून करत. कंपनीशी काही घेणंदेणं नाही. त्यांनी एक चूक केली. ट्विटर मध्ये त्यानी आपले टोपण नाव तयार करताना कुठेतरी स्वताच्या नावाचा उल्लेख केला आणि ते टॉप्सी  नावाच्या ट्विटर संबंधीत सर्च इंजिनने उचलले. कंपनीच्या मनेजरने   कर्मचाऱ्यांच्या नावावर सर्च मारला असता त्याला ह्या बाईंच्या नावावरचा  शृंगारिक ब्लॉग सापडला. परिणामी मिळाला बाईंना नारळ!

फेसबुक मध्ये मित्र मैत्रिणी शोधताना फेसबुक आपला मेल आयडी आणि पासवर्ड विचारते. बरेचदा अनवधानाने आपण तो देतो. पण हा विचार करत नाही की आपल्या मेलची सुरक्षितता धोक्यात आहे. फेसबुक मधील रेकोर्ड मध्ये आपला पासवर्ड जाऊ शकतो. हे म्हणजे घराच्या किल्ल्या अनोळखी व्यक्तीला दिल्यासारखेच झाले. काही लोक ब्लॉग  मध्ये स्वत:च्या  व्यक्तिगत गोष्टी इतक्या लिहितात की त्याच्या परिणामांची जाणीव नसते. नात्यातल्या , माहितीतल्या अप्रिय लोकांबद्दलचे आपले मत जाहीरपणे लिहितात. ज्याच्याबद्दल लिहिले आहे त्याला काय वाटेल ह्याचा विचार होत नाही. लिहिताना मजा वाटते पण नंतर पशात्ताप व्हायला नको म्हणजे झाले.

तेव्हा तात्पर्य काय की इंटरनेट वापरताना थोडी सबुरी पाहिजे. फेसबुक, ऑर्कुट वापरताना त्यांची प्रायव्हसी सेटींग्स समजून घ्यायला हवीत. ब्लॉग लिहिताना तारतम्य हवे. शब्द म्हणजे धनुष्यातून सोडलेला बाण म्हणतात. एकदा सोडला की परत येत नाही.  साधा बाण एकदाच काय तो घाव करतो आणि विस्मृतीत जातो. पण इंटरनेट वरचा शब्द म्हणजे बूमरॅंग म्हणायला हवा. विस्मृतीत काही जात नाही. एकदा  घाव केल्यावर परत सोडणाऱ्यावर कधी उलटेल ह्याचा नेम नाही.

Advertisements

13 thoughts on “नेट संस्कृती”

 1. मिसळपाव वर काल पासून काय चालले आहे पहा
  http://www.misalpav.com/node/12260
  ८० लाख रुपये ते एक कोटीचा फ्रॉड केलाय म्हणे तात्याने. इंटरनेट्वर मैत्री करुन अड्डा जमवून सर्वांना खोटी कारणे सांगून पैसे जमवलेत.

  1. @आकाश, मिसळ पाव वरील चर्चा वाचली. नेट मैत्रीचा केवढा दुरुपयोग!
   @मैथिली, आपल्यास लेख आवडतात हे वाचून बरं वाटलं धन्यवाद! . आणि हो, ब्लोग वर स्वागत 🙂

 2. नेट एटिकेट्स ही खरंच खूप क्लिष्ट गोष्ट आहे. मस्त लिहिलंय तुम्ही. बरेच महत्वाचे विषय स्पर्शले.
  बाय द वे. हे वरती ‘महिना’ का विचारतंय…तिथे ‘नाव’ असं हवंय का?

 3. विद्याधर,
  “बाय द वे. हे वरती ‘महिना’ का विचारतंय”
  आधी तुम्ही काय म्हणताय ते कळलच नाही. मग लक्षात आलं कि प्रतिक्रिया देण्याच्या फॉर्म मध्ये गडबड दिसतेय. थीम बदलल्यावर आली ही भानगड. पण आता प्रश्न असा की ती काढायची कशी? थीम चा कोड एडीट करता येत नाहीये ना!
  आणि हो, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. हा ब्लोग लिहिताना मिसळपाव वरचे “बुडीत खाते” माहिती नव्हते. पण नेट वरच्या भेटीच्या दुष्परिणामाचं एक रास्त उदाहरण आहे.

 4. मस्तच लिहल आहे…
  पासवर्डला घराच्या किल्ल्या म्हंटल ते पटल…मला सुदधा कोणत्याही साईटवर मेलचा पासवर्ड टाकायला सांगीतला की मी हव तर एकेक कॉन्टॅक्ट आरामात जोडण्याची मेहनत घेतो पण पासावर्ड देत नाही…

 5. निरंजनजी, संपूर्णपणे सहमत. इंटरनेटला विस्मृती नाही हे आपल्या स्मृतीत कायमचे ठेवायला हवे. अहो मी तर गेल्या वर्षापर्यंत फेसबुक-ऑरकुट कुठेच नव्हते. 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s