सौजन्याची ऐशी तैशी


कल्पना करा, बरेच दिवसांनी तुम्ही एक छान नाटक पाहायला बसला आहात. अगदी पुढची सीट. नाटक रंगात येतेय आणि बरोब्बर तुमच्या मागच्या सीटवरच्या प्रेक्षकाने पायाची अवाजवी हालचाल करून तुमच्या सीटच्या पाठीवर धक्का मारला. तुम्ही एकदा त्रासून मागे पहिले. पण उपयोग शून्य. हे महाशय लाथा मारणे काही थांबवत नाहीत. आलाय असा अनुभव कधी? मला आलाय. असाच नाही, तर सहप्रेक्षकांना तसदी होईल अशा प्रकारे वागण्याचे वेगवेगळे प्रकार अनुभवले आहेत.

एकदा पार्ल्यात कट्यार काळजात घुसली चा प्रयोग पाहायला गेलो होतो. शेजारी एक प्रौढ स्त्री आणि त्यांची कन्या होते. राहुल देशपांडेचे “ह्या भुवनातील सूर” हे गाणे मस्त रंगत होते. आणि शेजारी “सू सू” असे नाकातून आवाज आले. आधी वाटले पं वसंतरावांच्या आठवणीने शेजारच्या बाईसाहेब गहिवरल्या की काय. पण कसले काय. बाईना सर्दी झाली होती. प्रथम दुर्लक्ष केले. पण ह्यांचे नस्यध्वनी काही थांबेना. बर म्हटलं मध्यंतरात बाई वॉशरूम मध्ये जाऊन गळणाऱ्या नाकाची काळजी घेतील, तर तसेही नाही. मध्यंतरानंतर परत तो नस्यध्वनी चालूच. जाम वैताग आला.

आजकाल नाटक सिनेमा चालू व्हायच्या आधी मोबाईल बंद करायला सांगतात. पण ऐकतो तो मूर्ख! एखादा सिरिअस प्रसंग चालू आहे पडद्यावर आणि कुठेतरी चालू होते “आल इज वेल” ची धून आणि मग तोंडावर हात ठेवून “मी सिनेमात आहे” असं सांगणारा महाभाग! काही लोकांना तर लाज नावाचा प्रकार माहितच नसतो. एकदा एक प्रेक्षक सिनेमा चालू असताना मोठ्या मोठ्याने फोन वर “जेवायला कुठे भेटायचे” ह्याची चर्चा करत होता. शेवटी आजूबाजूच्यांनी आरडा ओरडा करून त्याला गप्प केले. अजून एक गोष्ट. जीम मध्ये बाहेरची पादत्राणे घालून व्यायामाच्या ठिकाणी वावरायला परवानगी नसते. व्यायामाच्या ठिकाणी वापरायला वेगळा पादत्राणांचा जोड ठेवायचा असतो. आमच्या जीम मध्ये एक बाई बिनधोक नेहेमीच्या वापरातील बूट घालून येतात. मॅनेजरने खटकले तर म्हणतात काय की वाटलं तर दंड करा, पण मी हेच बूट घालणार. आता काय म्हणावे?

एकदा विमानाच्या बोर्डिंग पास साठी रांगेत उभा होतो. एक महाभागांनी घुसखोरी केली. साहजिकच बाकीचे प्रवासी उखडले. त्याला हटकले तर म्हणतो कसा “This is India. Not foreign to have lines”  आता हा देशाबाद्दलचा अभिमान म्हणावा कि देशाची लाज काढणे म्हणावे?  सार्वजनिक ठिकाणी आपल्यामुळे इतरांना त्रास होईल असे वागू नये ह्याची पुसटशी जाणीवही ह्या लोकांना नसावी काय? आणि ही सुशिक्षित मध्यमवर्गीय मंडळी.  सामाजिक जाणीव वगैरे नाहीच.
पण ह्याच आपल्या सुशिक्षित पण बेशिस्तप्रिय समाजात काही मनाला भिडणारे प्रसंग पण घडतात. गच्च भरलेल्या बस मध्ये एखादे आजी किंवा आजोबा धडपडत चढले तर आपणहून उठून त्यांना जागा देणारे पाहिलेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांतून प्रवास करताना, जेव्हा जेवणाचा / फराळाचा डबा उघडला जातो तेव्हा सहप्रवाशाला आपल्या डब्यातल्या गोष्टी देऊ करणारे हमखास भेटतात. आणि अशी काही दृश्ये आढळली कि वाटतं
वा! माणुसकी अजून आहे तर शिल्लक
टीप: मागचा लेख आणी सद्य लेख ह्यांची शीर्षके नाटकांची नावे आहेत. हे केवळ योगायोगामुळे! शीर्षक देताना असा काही उद्देश नव्ह्ता.
Advertisements

3 thoughts on “सौजन्याची ऐशी तैशी”

  1. काय सांगायचं अहो…मध्यमवर्ग हा अहंवर्ग होत चाललाय….सगळ्यांना फक्त मी, स्वतः आणि माझे एवढ्याचीच चिंता…मग त्यापायी जग बुडालं तरी चालेल..माझ्याकडे माझे पैसे आहेत ना…मी सगळं माझ्या पैश्यानी करतो ना, मग लोकांना काय करायचं…हि वृत्ती झालीये..

    1. सिनेमामधे पॉपकार्न खातांना होणारा कर्र कर्र आवाज मला अतिशय इरिटेट करतो. लोकांचा सिव्हिक सेन्स कमीच झालाय यात काहीच शंका नाही.

      1. @महेंद्र, एक वेळ कर्रकर्र आवाज परवडला, पण स्ट्रॊने फुर्र्फुर्र आवाज काढतात त्याने अजून वैताग!
        @विद्याधर, “मध्यमवर्ग हा अहंवर्ग होत चालला” एकदम पटले! 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s