“हेचि काय फळ तव तपाला” !


काल ई-सकाळवर डोमिसाईल प्रमाणपत्रावर लेख वाचत होतो. त्यात एका निवृत्त सैनिकाची प्रतिक्रिया आहे. गोव्यात जन्मलेले पण जन्माने मराठी असलेले हे गृहस्थ भारतीय सेनेत दाखल झाले. सैन्याची नोकरी, तेव्हा पोस्टिंग हे सीमेवरच. आयुष्यातील बराच काल महाराष्ट्रा बाहेर गेलेला. १० वर्षापूर्वी निवृत्त होऊन पुण्यात स्थायिक झाले. पण आता परिस्थिती अशी की ह्यांना / ह्यांच्या मुलांना डोमिसाईल प्रमाणपत्र मिळत नाहीये. कारण अशा प्रमाणपत्रासाठी १५ वर्ष महाराष्ट्रात राहावे लागते किंवा जन्माने महाराष्ट्रीयन असावे लागते. दुर्दैवाने ह्या दोन्ही पात्रता कसोट्यात हे गृहस्थ येत नाहीत. देशासाठी २७ वर्षं सेवा करून, ह्यांच्या पदरी सरकार कडून एका अर्थी नकारघंटाच. ही जर सत्य स्थिती असेल तर खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे.

सैनिकांची एकूणच परिस्थिती अवघड. प्रतिकूल परिस्थितीत राहून ज्या देशाच्या संरक्षणासाठी लढायचं, त्याच देशात, निवृत्ती नंतर लाल फितीमुळे तयार झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत जगायचं! माझ्या एका बालमित्राचा मावसभाऊ कारगिल मध्ये होता. हिमवादळात जायबंदी झाला म्हणून त्याला परत पाठवले. खिशात एक पैसा नाही. डॉक्टरी उपचार नाहीत. अशा परिस्थितीत बिचारा कसाबसा गावाला परतला. देशासाठी लढणाऱ्या, प्रसंगी आत्मसमर्पण करायची तयारी असणाऱ्या ह्या धाडसी सैनिकांची ही गत होत असेल तर ही फक्त त्या सैनिकांचीच नव्हे तर साऱ्या देशाचीच शोकांतिका आहे असे म्हणावे लागेल.

भारत सरकारच्या एकूण खर्चाच्या १४%  खर्च हा संरक्षणावर होतो.  पाकिस्तान , चीन ह्यासारखे उपद्व्यापी शेजारी आणि हजारो किमी ची आपली सीमारेषा. अशी परिस्थिती असताना सैन्याचे महत्त्व खूपच आहे. जर त्याची योग्य ती काळजी घेतली नाही तर नवीन तरुण कसे आकर्षित होणार? २००७ च्या एका अहवालानुसार “ऑफिसर” पदाच्या २४% जागा रिकाम्या आहेत. ह्याला कारणे बरीच आहेत. जोखमीचे काम आणि त्यामानाने कमी पगार, बढतीची क्लिष्ट प्रक्रिया ही  त्यातील मुख्य  कारणे!  तरी बरं सहाव्या वेतन आयोगामध्ये सैनिकान्च्या पगारवाढीची तरतूद केली आहे.

देशाच्या मूलभूत गरजा, अन्न आणि सुरक्षा ह्यांचे महत्त्व लक्षात घेऊनच दिवंगत पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री ह्यांनी “जय जवान जय किसान” अशी घोषणा केली होती. दुर्दैवाने हे दोन्ही व्यवसाय सध्या पूर्णपणे दूर्लक्षित आहेत. ईतके की एक स्पर्धा काय जिंकली तर क्रिकेटर्स ना आपण डोक्यावर घेउन नाचतो. त्यांच्यावर पैशाचा वर्षाव करतो. त्यांना करसवलती देतो. पण कारगीलचा एक योद्धा घरी परतताना साध्या रेल्वेचे तिकीट खरेदी करू शकत नाही. ह्यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय?

जाता जाता एक निरीक्षण. ह्या जवान आणि किसानांशी संबंधित दोन्ही “खाती” सांभाळलेले मन्त्री कोण तर साक्षात “शरद पवार”! एक योगायोगच म्हणायचा!

Advertisements

6 thoughts on ““हेचि काय फळ तव तपाला” !”

  1. अगदी खरं. शेवटचं वाक्य तर मनातलं लिहिलं आहेत अगदी. हात लावेल त्याचं सोनं करणा-याला जर मिडास म्हणत असतील तर हात लावेल त्याची माती करणा-याला पवार म्हणायला हरकत नाही !!

    1. @हेरंब, एकदम सही लिहिलत!
      @शिरीष, हो मी क्रिकेट आवर्जुन पहातो. हा लेख लिहीताना सुध्दा IPL पहात होतो. 🙂
      @अपर्णा, हताश वाटत हे खर आहे! मागे कारगिलच्या वेळी पैसे जमा करून सैनिकांच्या विधवांना पाठवले होते. पण आपण ह्या उप्पर काय करु शकणार?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s