मुखपृष्ठ > ब्लोग्गिंग > आयपीएल आणि करसवलत

आयपीएल आणि करसवलत


नुकतीच बातमी वाचली की महाराष्ट्र सरकार आयपीएलच्या सामन्यांवर करमणूक कर लावावा कि नाही ह्यावर विचारविनिमय करत आहे. आता गम्मत अशी की काँग्रेसला कर लावायचा आहे आणि राष्ट्रवादीला नाही. राष्ट्रवादी कर लावायला विरोध का करत आहे हे  सुज्ञास सांगणे न लगे! ही बातमी वाचली आणि मला फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळची गोष्ट आठवली. घरात ब्रेड नाही म्हणून राजवाड्यावर आलेल्या जनतेच्या मोर्चाला उद्देशून फ्रेच राजकुमारीने “ब्रेड नाही तर केक खा” असे वक्तव्य केले होते. तसेच काहीसे आत्ता चालले आहे. साखर परवडत नाही? स्वस्तात आयपीएल पहा!

क्रिकेट पाहायला मलाही आवडते. आयपीएलतर्फे खेळाडू आणि संधीसाधूंची तुंबडी भरली जातेय म्हणून दु:श्वास पण नाही. पण आयपीएल लोकप्रिय झाले म्हणून काय त्यांना कर माफ? एवढी काय देशसेवा केली आहे मोदी आणि कंपनीने? आयपीएल च्या यशामुळे भारताची मान जगात उंचावली आहे असे मोदी म्हणतात. अहो पण ज्या देशात सामान्य माणूस एक वेळचे पोटभर जेवू शकत नाही, पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करतो, त्या देशाला आयपीएल मधून मिळणारी प्रतिष्ठा काय कामाची? ह्यातून मिळणारा पैसा गर्भाश्रीमन्तांच्याच खिशात जाणार ना शेवटी? मग भरावा लागला करमणूक कर, तर बिघडले कुठे? असे ऐकतो की ह्या करसवलतीमुळे शासनाचा ३०० कोटी रुपये महसूल बुडणार आहे. बाकीच्या राज्यांनी हा करमणूक कर लादला आहे. शिवाय ह्या सामन्यांना लागणाऱ्या सुरक्षेचा खर्च पण आयपीएल वरच टाकला आहे. पण आमचे दयाळू सरकार, ज्याचे मंत्री आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना नशाबाज असा शिक्का लावतात, ते मात्र आयपीलला करसवलत देऊन डोक्यावर बसवायला निघाले आहे. धन्य आहे!

Advertisements
 1. मार्च 18, 2010 येथे 4:30 pm

  मला तर वाटतं की करमणूक कर दुप्पट करावा. तिकिटाचे २००० रुपये जर लोकं देउ शकतात आणि मॅच पाहू शकतात , तर करमणूक कर नक्कीच भरू शकतील.
  तिकिटाचे दर अतिशय जास्त आहेत. कमीतकमी तिकिट २५० रू आहे असे समजते . सरकार काय करेल तेवढं थोडंच आहे..

  • मार्च 18, 2010 येथे 5:31 pm

   एकदम बरोबर बोललात. कर दुप्पट केला तरी काही बिघडत नाही. सहज बघितलं bookmyshow.com वर तर मुंबईला तिकीटाची किमान किंमत १००० रुपये आहे! ह्या पेक्षा स्वस्त तिकिटं मिळतनाहीयेत.

 2. मार्च 20, 2010 येथे 3:02 सकाळी

  ज्या मुलभुत गरजा आहेत त्यांवर भरमसाठ कर आणि हया असल्या गोष्टी करमुक्त…धन्य धन्य….

  • मार्च 20, 2010 येथे 10:13 सकाळी

   देवेन्द्र,
   धोरण स्पष्ट आहे, २०% लोकान्च्या फ़ायद्यासाठी ८०% जनतेला वेठीस धरायचे. कारण हे ८०% एकत्र कधीच येत नाहीत!

 3. मार्च 20, 2010 येथे 1:49 pm

  अगदी अचुक बोललात….

 4. AARTI R THAKUR
  एप्रिल 18, 2010 येथे 8:02 pm

  agdi amchya manatalach lihila ahes, ati shrimantankadech paisa jato ahe ani apala sarkar kahicha karat nahi.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: