सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या


आत्ताच याहूवर बातमी वाचली की राजला सर्वोच्च न्यायालयाकडून प्रक्षोभक भाषणे न करण्याचा उपदेश मिळाला. उत्तर भारतीयांबद्दल निदंक भाष्य केले म्हणून साहेबांवर काही बिहारी लोकांनी बिहार / उत्तर प्रदेश येथे खटले  भरले आहेत. ते खटले तिकडील स्थानिक न्यायालयात आहेत, ते सर्व एकत्र करून महाराष्ट्रात हलवावेत असा अर्ज राज साहेबांनी केला होता. ह्या बातमीत असा एक उल्लेख आहे की  बिहार / उत्तरप्रदेश येथे राज विरोधी वातावरण आहे  म्हणून राज साहेबाना तिकडे खटल्यासाठी उपस्थित राहण्यामध्ये सुरक्षेची चिंता आहे म्हणे. म्हणून हा खटाटोप.

आता ही गोष्ट आधी का नाही बरे सुचली? उगाच सापाच्या शेपटावर पाय ठेवायचा आणि मग साप चावेल अशी भीती बाळगायची. आता विस्तवात हात घातला  तर पोळून निघणारच ना? आपणच युद्धाला  तोंड फोडले आणि आता सुरक्षेच्या कारणावरून चिंता करणे मराठी मर्दाला शोभत नाही बुवा.

Advertisements

6 thoughts on “सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या”

  1. आशिष, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
   हेरंब, ही मुत्सद्देगिरी असेलही. एकच वाटतं, नेता म्हणून आपण जे बोलतो त्याचे दूरगामी परिणाम काय ह्याचा पण विचार व्हावा. आणि त्या परिणामांची पूर्ण जबाबदारी पणघ्यावी.

  1. वीरेंद्र, न्यायालयाचा वेळ वाचवायची ईच्छा होती तर जे न्यायालयाला अयोग्य वाटू शकतं असं निंदाजनक बोलायला तरी नको होतं. बाकी मला मनसेच्या मराठी अभिमानाविषयी काही वावगं नाही, पण त्यासाठी अवलंबला जाणारा मार्ग हा मला बिलकूल पटत नाही.

   1. त्यांचा मार्ग चुकला हे खरंच .. पण १० वेळा सांगून ऐकत नसेल तर काय कराव ..
    आता कुठे कंपन्या जरा नोंद घेतायत मराठीची ..
    गम्मत आणि शोकांतिका सांगतो .. महाराष्ट्र बँकेचे call center मराठी भाषेचा पर्याय देत नाही .. हिंदी व इंग्रजी .. याला काय म्हणव .. महाराष्ट्राच्या पैशावर जागून मराठीची अवहेलना की दुर्लक्ष ??
    असो ..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s