मावशी महिमा


हल्ली आता एकत्र कुटुंब वगैरे नामशेषच होत चालली आहेत. हम दो हमारे दो चा संसार. अशा ह्या छोट्या कुटुंबांमध्ये रोज सकाळी कोणाचे नियमित स्मरण होत असेल तर मावशीचे. घरातील कौटुंबिक स्वास्थ्य टिकवण्याचे जिच्यात सामर्थ्य आहे ती ही मावशी. भाषेचे राजकारण न खेळता अमराठी कुटुंबाना पण झक मारत मराठी बोलायला लावणारी ती ही मावशी. जिचे पाय घराच्या दाराशी आले नाही तर आपली पायधूळ घरातून निघत नाही ती ही मावशी. घरातील इतस्ततः विखुरलेल्या अनेक गोष्टीतून आपल्याला हवी ती गोष्ट निमिषार्धात शोधून देणारी मावशी. म्हणजे साक्षात कामवाली. हिचे वय २५ पासून ६० पर्यंत काही असो पण ती मावशीच. आणि घराचे मालक आणि मालकीण हे तिचे “ताई आणि दादा”. आता चिकित्सकांनी ह्या नातेसंबंधांचे जास्ती विश्लेषण करू नये कारण हाती काही लागणार नाही. केवळ दैनंदिन व्यवहारात एकमेकांना सौजान्यपणे संबोधायची उपनामे एव्हढाच हेतू.

ह्या मावश्यांच्या आपण केवढे अधीन असतो हे त्यांच्या गैरहजेरीतच समजते. तसं पाहिलं तर ह्यांचा घरातील वावर दिवसाला फारतर १ तास. पण शेजारण्यांची आख्खी दुपार ह्यांच्या विषयी चर्चा करण्यात जाईल. एकवेळ घरातील एखादं माणूस (बहुधा नवरा माणूसच) दिवसभर घरी फिरकलं नाही तरी बिघडत नाही पण ह्या मावशीबाई आल्या नाही  तर गृहिणींच्या जीवाची तळमळ होत राहते. घरकाम हे जरी त्यांचं प्रमुख कर्तव्य असलं तरी “Value Addition”  ह्या नावाखाली शेजाऱ्या पाजाऱ्या मंडळींची गुपितं सांगणे हे कामही आपलं कर्तव्याच असल्याप्रमाणे  ह्या मावश्या बजावत असतात. आणि गम्मत अशी की प्रत्येक घरात ह्या सांगणार की इतरांकडे कसं जास्त काम पडतं आणि तुमच्या कडे कसं सांभाळून घेतलं जातं वगैरे वगैरे. आता सुज्ञ गृहिणी यातून काय संकेत घ्यायचे ते घेतातच. जेव्हा जास्त स्तुती होते तेव्हा उधारीची मागणी ही होतेच. काही उडत्या पाखरांचे पंख मोजणाऱ्या चाणाक्ष गृहिणी तर ह्यांच्या स्तुतीसुमनांच्या तीव्रतेनुसार उधारीची रक्कम किंवा खाड्याचे दिवस मोजतात.

मध्ये एकदा आमच्या सोसायटीतील नवीनच ओळख झालेले एक शेजारी सहपरिवार आमच्याकडे गप्पा मारायला आले होते. गप्पा रंगात आल्या होत्या तेवढ्यात सौ शेजारी आपल्या नवऱ्याला घरी निघायची घाई करू लागल्या. नवऱ्याने नाराजीनेच विचारले “एव्हढी काय घाई?” तेव्हा सौ शेजारी म्हणाली की पोळ्या करायच्या मावशी कुलूप बघून निघून जातील. तेव्हा बिचाऱ्या नवऱ्याची प्रतिक्रिया बोलकी होती. तो मला म्हणाला, “पाहिलंत, घरात न राहणाऱ्या most important व्यक्ती पुढे ह्या घरात राहणाऱ्या least important व्यक्तीची काय किमत आहे ते? आता छान गप्पात रंगलो असताना, ह्या मावशीसाठी मला घरी जायला लागतंय” मला पटलं त्याचं बोलणं.

बाकी जेव्हा बायको माहेरी वगैरे जाते तेव्हा मात्र ह्या मावश्यांची किमत नवरे मंडळीना कळते. विशेष करून सैपाक करणाऱ्या मावशींची. तेव्हा “माय मरो पण मावशी जगो” च्या धर्तीवर म्हणावेसे वाटते “बायको माहेरी जावो, पण मावशी रोज येवो!”

Advertisements

7 thoughts on “मावशी महिमा”

 1. हा हा हा…परदेशात गेल्यामुळे या महत्वाच्या सोयीला मुकलेले आमच्यासारखे कित्येक कुटुंबीय अशा मावशांची आठवण काढून रडकुंडीला येत असणार….हाय री किस्मत….
  केवळ घरात कामाला आणि मुख्य पोळीला बाई मिळणार ही दोन कारणं मायदेशात परत यायला सध्या पुरेशी आहेत..फ़क्त मुहुर्त सुटायचा आहे….:)

 2. आमच्या घरी तिन मावश्या आहेत. एकीने दांडी मारली तर दुसरी काम करेल म्हणुन. पण होतं काय की तिन्ही मावश्या ( भांडी घासणे – १ मावशी, धुणे, लादी पुसणे- दुसरी मावशी , अन पोळ्या करायला तिसरी मावशी ) एकद दांडी मारतात, किंवा एक येणार नसेल तर निरोप हमखास उशिरा देते, शेवटी सगळं काम स्वतःलाच करावं लागतं सौ.ला . पुढे घरात काय समर प्रसंग ओढवत असेल याचा कल्पनाविलास तुमच्यावरच सोडतो.

  1. @महेंद्र, म्हणतात ना, “घरोघरी मातीच्या चुली”, त्यातलाच प्रकार. आणि जेव्हा आपल्याला जास्त गरज असते (म्हणजे पाव्हणे वगैरे असतील) तर हमखास ह्यांची दांडी असते. केव्हढे परावलंबी झालो आहोत आपण!

   @अपर्णा, हेरंब, एकदम बरोबर बोललात. मी जेव्हा भारतात परतण्याचा निर्णय घेतला, तेव्हा माझे अमेरिकन सहकारी विचारायचे की तुला इकडची luxurious lifestyle सोडून परत कसे जावेसे वाटते? तेव्हा माझे उत्तर असे की तिकडे गेल्यावर मला ईस्त्री करणे, कपडे / भांडी, घर आवरणे, ह्यासाठी स्वतः कंबरडे मोडायला लागात नाही. अशी luxury तुमच्या अमेरिकेत मिळवायची तर बिल गेट्स बनावे लागेल 🙂

 3. Niranjan and all

  Well said. Apan dependent zalo ahot mavshyanvar pan all by choice and this great can never be replaced anyhow..especially India baher kambarde modun ghar kaam kelyavar 🙂 Mi mazya personal blog var he ek post lihilele amchya mavshinbaddal…

  http://surfacingthoughts.blogspot.com/search?updated-max=2009-09-24T22%3A44%3A00-07%3A00&max-results=7

  Swati

  http://surfacingthoughts.blogspot.com
  http://creations1000.blogspot.com

 4. मस्त पोस्ट आहे…..खरय़ं आपलं आयूष्य सुखकर करण्यात ज्या अनेक हातांची साथ असते त्यात या ’मावशी”’चा नंबर वर असतो…

  जाता जाता मी खरडलेला एक लेख , ’मावशी ते मेड…’
  http://sahajach.wordpress.com/2009/11/03/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a1/

  (स्वत:च्या ब्लॉगची जाहिरात स्वत:च करतेय 🙂 )

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s