सिम्पली इडलीशिअस


पुणे आणि साऊथ इंडिअन फूड म्हटले की सर्वात पहिल्यांदा डोळ्यासमोर येते ते वैशाली. पण वैशाली सोडून सुद्धा बरीच चांगली साऊथ इंडिअन हॉटेलं आहेत. त्यातलंच एक म्हणजे सिम्पली इडलीशिअस! आता ह्याला हॉटेल म्हणणे म्हणजे जरा अतिशयोक्तीच आहे, त्यापेक्षा टपरी म्हणणे जास्ती योग्य ठरेल. औंध मध्ये DAV शाळेच्या समोर कोटबागी हॉस्पिटलची गल्ली जाते. त्या गल्लीत ही टपरी आहे. जेमतेम २०-२५ माणसे बसतील एवढीच जागा. कधीही गर्दीच असते. माझा पूर्वीच्या कंपनीचा एक मित्रांचा ग्रूप आहे. आम्ही साधारण महिन्या / दोन महिन्यात इकडे आवर्जून लंचला येतो.

आता साऊथ इंडिअन म्हणजे इडली ही चांगली पाहिजेच. एका प्लेट मध्ये तीन हलक्या आणि व्यवस्थित आंबवलेल्या पिठाच्या इडल्या, सांबार आणि टोमाटो चटणी! पण आमचे जेवण सुरु होते ते रस्सम ने. पाणी प्यायचे फुलपात्र असते त्यात देतात. एकदम सणसणीत! शिवाय डोश्याचे वेगवेगळे प्रकार पण छान मिळतात. इकडचा माझा आवडता प्रकार म्हणजे टोमाटो ओनिअन उत्तप्पा. शिवाय रवा ओनिअन डोसा पण छान मिळतो.

रस्सम आणि डोसा झाला की आवर्जून चाखायचा पदार्थ म्हणजे भात. आता तुम्ही म्हणाल की भात काय चाखायचा! पण हा नुसता भात नव्हे. दर दिवशी वेगवेगळ्या प्रकारचा भात इकडे मिळतो. एक दिवस लिंबू भात, एक दिवस चिंचेचा (tamarind rice) इत्यादी. पण माझा आवडता म्हणजे बिसीबेले भात. हा सांबारात कालवलेल्या भातासारखा काहीसा लागतो. एकदम सरस! दर गुरुवारी मिळतो. शिवाय रोज दही भात पण मिळतोच. तोही खूपच स्वादिष्ट.

आता तिसरा कोर्स म्हणजे डेझर्ट! इकडल्या शिऱ्याला (केसरी) सरच नाही! तुपाने थबथबलेला. जेवणाच्या शेवटी इकडची फिल्टर कॉफी नाही घेतली तर ते जेवणच नव्हे! अस्सल मद्रासी चव असते. आणि दक्षिणेत मिळते तशीच स्टीलचा पेला आणि वाटीमधून मिळते.

कधीतरी चमचमीत पंजाबी खाण्यात बदल म्हणून जायला एक उत्तम पर्याय आहे. हां, पण अम्बियांस वगैरेचे चोचले काही इकडे पुरवले जाणार नाहीत!

Advertisements

6 thoughts on “सिम्पली इडलीशिअस”

    1. महेंद्र,
      जरूर भेट द्या. एखादा गुरुवार असेल तर मी पण तिकडे कदाचित भेटीन 🙂 . तुमच्यासाठी तिकडे जाण्याच्या मार्गाची लिंक देत आहे:
      http://www.sadakmap.com/p/Simply-Idlicious/

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s