अर्थक्रांती


फेब्रुवारी महिना म्हणजे आपल्याकडे बजेटची धामधूम. निवडणुका सोडल्या  तर हाच एक काळ जेव्हा देशभर आम आदमी प्रसिद्धीच्या झोतात येतो. बाकी ही फूटकळच प्रसिद्धी, कारण बजेट मध्ये ह्या बिचाऱ्या आम आदमीची सोय काही नसतेच. तरीसुद्धा दरवर्षी हा  बिचारा आम आदमी ह्या वर्षी तरी टॅक्स कमी होईल अश्या वेड्या आशेने बजेट कडे बघत राहतो. पण समजा खरंच ह्या वर्षी अर्थमंत्र्यांनी सर्व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर रद्द केले  तर? अगदी कस्टम ड्युटी सकट? तुम्ही म्हणत असाल की ह्याच्या अंगात बहुतेक मुंगेरीलाल शिरला आहे म्हणून अशी स्वप्ने रंगवतोय. म्हणे सगळे कर रद्द. मग देश चालणार कसा? पण मी फोल स्वप्न रंगवत नाहीये. खरंच असं होवू शकतं. कसं?  तर त्याला उत्तर आहे अर्थक्रांती!

आपलाच एक मराठी माणूस श्री अनिल  बोकील. हे पेशाने इंजिनिअर. स्वतःचा व्यवसाय करताना एकूणच देशाच्या आर्थिक स्थितीचा त्यांनी अभ्यास केला. प्रगत देशांची आर्थिक स्थिती सुद्धा जिज्ञासू वृत्तीने पाहिली. आणि त्यातूनच त्यांनी अर्थाक्रांतीचा प्रस्ताव तयार केला. त्यांच्या प्रस्तावचा  भर मुख्यत्वे ५० रुपयाच्या वरचे चलन बंद करणे हा आहे. असे केल्याने साहजिकच रोखीच्या व्यवहारावर बंधन येउन, लोकांना बँकांचे व्यवहार करणे भाग पडेल. साहजिकच त्यामुळे काळ्या पैशावर नियंत्रण येईल. त्यांचा प्रस्ताव असे सुचवतो की  बँकेच्या प्रत्येक व्यवहारावर फक्त २% कर लावायचा आणि बाकी सर्व गुंतागुंतीचे कर रद्द करायचे. ह्यामुळे सरकारचा पण करवसुलीचा भार कमी होईल व बँकेने वसूल केलेल्या करातून देश चालवता येईल. एवढेच काय तर दारिद्र्य रेषेच्या खालील लोकांसाठी social security  सारखी योजना पण राबवता येईल.

हा प्रस्ताव श्री बोकील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकारणी, अर्थतज्ञ, उद्योजक ह्यांना वेगवेगळ्या वेळी सदर केला. आणि सर्वांना तो पसंत पण पडला. पण प्रश्न आहे, पुढे काय? कागदोपत्री तर छानच आहे. पण हे राजकारणी आपणच आपल्या पायावर धोंडा कसा पडून घेणार? कारण काळा पैसा, भ्रष्टाचार हे तर राजकारण्यांचे पोषक घटक. म्हणूनच जनजागृतीवर अर्थक्रांती ट्रस्ट भर देत आहे. त्यांची अशी धारणा आहे की जनतेचा दबावाच अशा प्रकारची क्रांती घडवू शकतो.

आता अर्थशास्त्र आणि माझे काही जिव्हाळ्याचे संबंध नाहीत. तेव्हा मी ह्यावर सविस्तर / अचूक माहिती देवू शकत नाही. ह्या लेखाचा उद्देश फक्त ह्या अर्थक्रांतीबद्दल वाचकांना माहिती व्हावी एव्हढाच होता. ह्याच विषयावर नीता कुलकर्णी नावाच्या ब्लॉग लेखिकेने खूपच छान लेख लिहिला आहे. तसेच अधिक माहितीसाठी अर्थक्रांतीच्या वेबसाईट वर पहा.

Advertisements

One thought on “अर्थक्रांती”

  1. काही कारणांनी महेंद्र ह्यांची खालील प्रतिक्रिया पुसली गेली म्हणून परत पाठवात आहे:

    महेंद्र लिहितात,
    “तरीसुद्धा दरवर्षी हा बिचारा आम आदमी ह्या वर्षी तरी टॅक्स कमी होईल अश्या वेड्या आशेने बजेट कडे बघत राहतो.”

    काय करणार?? चांभाराची नजर चप्पलकडे… 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s