सूडबुद्धी


कालच्या सकाळच्या मुक्तपीठ मध्ये पहिल्याच पानावर लेख आला होता. शीर्षक होते “पन्नास पैशांनी बढती रोखली”. लेखक महाशयांचे मुंबईच्या बस मध्ये गर्दी मुळे तिकीट काढायचे राहून जाते आणि तपासनीस पकडतो. ह्यांनी आपल्या प्रामाणिकपणाची ग्वाही देत तपासनीसाला दंड देण्यास नाकारले. तपासनीसाने शेवटी वरिष्ठाकडे नेले व दंड वसूल केला. महाशयांना पकडले गेल्याचा राग एवढा आला की ह्यांनी BEST च्या वरिष्ट अधिकाऱ्यांकडे पत्राने निषेध नोंदवला. BEST ने चक्क ह्यांच्या पत्राची दखल घेउन ह्यांचा दंड परत करवून दिलगिरी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर प्रस्तुत तपासनीसाची बढती पण अडवली. हा तपासनीस शेवटी ह्यांच्याकडे येऊन तक्रार मागे घेण्याबद्दल गयावया करू लागला तर हे महाशय ह्याला अद्दल घडावी म्हणून आपली तक्रार मागे घ्यायला तयार नाहीत.

लेख वाचून चक्क कपाळाला हात लावला. आता एक तर बिचारा  तपासनीस आपले काम कर्तव्यबुद्धीने करत होता. तिकीट काढणे हे प्रवाश्याचे कर्तव्य. आता गर्दीमुळे  ते कर्तव्य प्रवाशाला बजावता नाही आले, तर नशीब समजून दंड भरून तो प्रसंग मिटवायचा कि नाही? म्हणून लगेच चोर थोडीच समजला जातो? बरं, घरी गेल्यावर BEST च्या वरिष्ठांकडे आपली बाजू मांडली आणि त्यांनी ती मानून दंडाची रक्कम परत पण केली. पण ह्यांचा स्वाभिमान एवढा दुखावला गेला की ह्यांनी त्या बिचाऱ्या  तपासनीसाची बढती रोखून ठेवली. हा लेख वाचून झाल्यावर मला त्या  तपासनिसाचेच वाईट वाटले. ह्या गृहस्थांनी मात्र उगाच स्वतःचा व्हिलन बनवून घेतला. आधी त्या  तपासनिसाचे व त्याच्या कुटुंबाचे तळतळाट घेतले आणि आता सकाळ मध्ये लिहून आपल्या क्षमाहीनतेची प्रसिद्धी! हे गृहस्थ शाळेत शिक्षक आहेत. म्हणजे झाले मुलांचे कल्याण! मला 3 idiots मधल्या प्रो. सहस्रबुद्धेंची आठवण झाली. (अरेच्या, हे तर मराठी नाव! नशीब, मराठी माणसाला व्हिलन दाखवून पैसे कमावले असे समजून अजून आंदोलन नाही झाले. असो)

सूडबुद्धीने माणूस केवढा आंधळा होतो. त्यात कोणाचा खरच फायदा होतो? समोरच्याने काही का कारणाने चूक कबूल केली तर त्याला माफ केले  तर माफ करणाऱ्याला मोठेपणा तर मिळतोच. आणि पश्चात्तापदग्ध मनुष्याच्या चेहेऱ्यावरचे हास्य जो आनंद देवून जातो तो काही औरच. उगाच नाही आपल्याकडे संतवचन आहे, “दया क्षमा शांती तेथे देवाची वसती”.

Advertisements

8 thoughts on “सूडबुद्धी”

  1. खरंय तुमचं म्हणणं. मला राहून राहून त्या तिकीट तपासनिसाचच वाईट वाटत होतं, म्हणून लिहिलं. मास्तर नेट वाचकांकडून नाराजीचे अभिप्राय मिळवतायत ई-सकाळ वर

 1. काय मुर्खपणा आहे हा.. मी आत्ताच तुम्ही दिलेल्या लिंकवर जाऊन ती बातमी वाचली. लोकांनी सॉलिड प्रतिक्रिया देऊन त्या मास्तरचा उद्धार केला आहे.

  1. हेरंब
   मला नवल अशाचे वाटते की मास्तरांना अजून आपली काही चूक झाली होती असे वाटत नाहीये. त्यांनी लेखाच्या शेवटी जरी २५ वर्षापूर्वी केलेल्या गोष्टीचा पश्चात्ताप होतोय असे लिहिले असते तरी लोकांनी एवढ्या तीव्र प्रतिक्रिया दिल्या नसत्या.

 2. माझ्या माहीतीप्रमाणे हा लेख लिहिणारे रमेश वैद्य हे शिवाजीनगरच्या भारत इंग्लीश स्कूल चे माजी मुख्याध्यापक आहेत.

  (मी त्यांचा नातेवाईक नाही.)

  1. अनिकेत, माहिती बद्दल धन्यवाद. मास्तरांचे वय बघता त्यांचा उल्लेख आदरानेच व्हायला हवा. पण खरंच मास्तरांनी त्या तपासनीसाला माफ करायला हवंहोतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s