वांग्याचे (करपलेले) भरीत!


नाही! हा लेख पाककृती वर नाहीये. सध्या वांग्याला घेऊन सरकारात जे काही शिजतं आहे त्याबद्दल आहे. बी टी वांगे असे ह्या वांग्याचे नाव. सरकारने monsanto ह्या अमेरिकन कंपनीच्या सहाय्याने गुणसूत्रात बदल करून ह्या वांग्याचे बियाणे तयार केले आहे. ह्याला कीड लागत नाही. त्यामुळे कीटकनाशकांचा खर्च कमी आणि एकूणच उत्पादन जास्ती होईल असा सरकारचा दावा आहे. पण शेतकरी आणि शास्त्रज्ञ मात्र हे बियाणे वापरण्याच्या विरोधात आहेत.

ह्या प्रश्नात शेतकरी जागरूक आहेत हे विशेष. genetic engineering हे शास्त्र तसे नवीनच आहे. बऱ्याच राष्ट्रांनी अजून genetically modified अन्न वापरायला परवानगी दिलेली नाही. शास्त्राद्यांच्या प्रयोगात असे पण आढळून आले की ह्या प्रकारचे अन्न दिल्याने प्राण्यांवर घातक परिणाम झाले. एवढे सर्व असताना आपले सरकार का बरे हे वांगे शेतकऱ्यांच्या तोंडात कोंबत आहे? पूर्वी रासायनिक खते म्हणजे शेतकऱ्याला वरदान असे वाटायचे. शेतकऱ्यांनी खुशाल ही खते वापरणे सुरु केले. आणि झाले काय? शेतजमिनी प्रदूषित झाल्या. मी असे ऐकतो की पंजाब मधील काही भागात ह्या जमिनीतील पाण्याने कर्करोगासारखे दुर्धर आजार बळावले. आता ह्या अनुभवातून शेतकरी तरी शिकलेले वाटत आहेत. पण सरकार मात्र डोळ्यांवर कातडे ओढून बसले आहे. काय नक्की शिजतेय ह्यांच्या डोक्यात?

आता थोडेसे Monsonto  बद्दल. मी अगदी थोडाच वेळ ह्या कंपनी बद्दल गुगल वर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, तर काय आढळून आले? ह्या कंपनीने आपली genetically modified उत्पादने इंडोनेशियाला विकताना सरकारला प्रचंड लाच दिली. ही गोष्ट उघडकीला आल्यावर कंपनीने गुन्हा कबूल करून रीतसर दंड पण भरला आहे. बाकी सुद्धा बरेच घोटाळे करण्यात ह्या कंपनीचा हातखंडा आहे असे समजले जाते. तर अशा ह्या वादग्रस्त कंपनीचे वादग्रस्त उत्पादन एवढ्या उत्साहात आपले मंत्री का पुरस्कृत करत आहेत हे सुज्ञास सांगणे न लगे!

Advertisements

4 thoughts on “वांग्याचे (करपलेले) भरीत!”

 1. जेनेटिकली मॉडीफाईड प्रॉडक्ट्स नेस्ले ही आधीपासुनच विकते आहे. जेंव्हा ग्रिन पिस या एन जी ओ ने एक पिटीशन दाखल केलं तेंव्हा नेस्ले चं म्हणणं होतं की भारतिय जनतेलाच जेनेटीकली मॉडीफाइड फुड पाहिजे आहे, म्हणुन आम्ही विकतो.
  एक गोष्ट उल्लेखनिय आहे , की नेस्ले जगात इतरत्र कुठेच जेनेटिकली मॉडीफाइड प्रॉड्क्ट्स विकत नाही.
  ग्रिनपिसडॉटओआरजी वर लॉग इन करुन बघा.. ही इथे आहे लिंक. http://greenpeace.in/safefood/the-biggest-baingan-bharta-ever/

  1. महेंद्र,
   प्रवासात असल्याने आधी उत्तर देऊ शकलो नाही. नेस्ले बद्दल माहित नव्हतं, मऊ लागलं म्हणून कोपरा पासून खणण्याचा प्रकार दिसतो हा.

   1. ग्रिन पिस ने बरंच काम केलंय भारता मधे . मी त्यांच्या प्रत्येक ऑन लाइन पिटिशनला सपोर्ट करतो. हे वांग्याचं पण त्यंनी बरंच लाउन धरलं होतं. आजच मेल आलाय, की आपण जिंकलो.. मॉडीफाईड चा नाद सोडला सरकारने..

   2. महेंद्र,
    सरकारच्या माघारीची बातमी वाचून खूप आनंद झाला. थोडक्यात म्हणजे, थोडीशी जरी जनजागृती झाली तरच ह्याची मनमानी कमी होईल असे वाटते. ग्रीनपीसचे उपक्रम स्तुत्यचआहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s