विज्ञानाश्रम


खेडोपाडी शिक्षण पुरवणे हे तसं कठीण काम. त्यात आपल्याकडे पुस्तकी ज्ञानावर भर देण्याकडे जास्ती कल असतो. साहजिकच अशाप्रकारे शिकणे बोरिंग होत असते. आता शहरातील मुलं बिचारी पालकांच्या आणि शिक्षकांच्या धाकामुळे का होईना, ह्या रटाळ शिक्षण पद्धतीत तयार होतात. आपणही झालो. पण खेड्यात, जिकडे पोरगं शाळेला गेलं म्हणजे शेतात काम करणारे दोन हात कमी अशी परिस्थिती असते, तिकडील मुलं अर्धवट शाळा सोडून बसली तर नवल  ते काय? आणि अशी परिस्थिती असेल तर पोरगं हाताबाहेर जायला तो कितीसा वेळ लागणार? पण एका शास्त्रज्ञाने ह्या शिक्षणपद्धतीत बदल आणायचं मनावर घेतलं, आणि आपली जुनी आश्रम पद्धती आणि आधुनिक विज्ञान ह्यांची सांगड घालून त्यांनी साकारला तो विज्ञानाश्रम!

डॉक्टर कलबाग हे त्या शास्त्रज्ञाचे नाव. PhD मिळवल्यावर, अमेरिकेत सुखात अजून संशोधन करायची संधी असताना सुद्धा डॉ. कलबाग भारतात परतले. काही वर्ष  भारतात नोकरी केल्यावर त्यांनी आपल्या विज्ञानाश्रमाच्या स्वप्नाचा पाठपुरावा केला. १९८२ साली , पाबळ ह्या छोट्या गावात त्यांनी हा आश्रम सुरु केला. ह्या आश्रमाचे वैशिट्य म्हणजे आपली नेहमीच्या “वाचा आणि शिका” ह्या पद्धतीला फाटा देऊन येथे प्रयोगातून शिक्षण ही पद्दत अवलंबली आहे. त्यांच्या पद्धतीचे यश म्हणजे जी मुलं नेहेमीच्या शिक्षणपद्धतीत मागे पडत होती, त्याच मुलांचे विज्ञानाश्रमात शिकल्यावर स्वतःचे उद्योग उभे राहिले आहेत. ह्या मुलांची काही प्रोजेक्ट्स म्हणजे mechbull नावाचा स्वस्त आणि पूर्ण देशी बनावटीचा ट्रॅक्टर, अगदी स्वस्तातील, भूकंपातही टिकतील अशी छोटी घरे, सायकलने चालवायचा पाण्याचा हात पंप वगैरे.

मला  डॉ. कलबागांचे विज्ञानाश्रमाच्या यशावर एक वाक्य खूपच भावले. ते म्हणतात, My success story will be when the system runs without me“. आता डॉक्टर जावून ६ च्या वर वर्ष झाली आहेत. पण त्यांच्या शिष्यांनी हा ज्ञानयज्ञ पुढे चालू ठेवला आहे. आणि नुसते शिक्षण देऊन विज्ञानाश्रम  थांबले  नाही. ह्या  तरुणांना स्वतंत्र उद्योग चालू करता यावा म्हणून कर्ज मिळवण्यासाठी business plan बनवणे, बँकांशी संवाद साधणे इत्यादी गोष्टीमध्ये पण मदत केली जाते. शिवाय काही स्वयंसेवक आपणहून मार्गदर्शकाचे काम करतात. विज्ञानाश्रामाने आता Lend-a-hand-india ह्या सेवाभावी संस्थेच्या मार्फत तात्पुरते भांडवल उभारायची सोय पण केली आहे.

ह्या विज्ञानाश्रमाची जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी म्हणून माझा मित्र समीर शिपूरकर ह्याने बरीच मेहनत करून विज्ञानाश्रमावर एक माहितीपट बनवला आहे. त्याची लिंक इकडे देत आहे:

Advertisements

4 thoughts on “विज्ञानाश्रम”

 1. निरंजन मित्रा तू खूपच जोरदार आघाडी उघडलेली आहेस. अभिनंदन. छान लिहितो आहेस. लिहित रहा. तू विज्ञान आश्रमाच्या माहितीपटाबाबत लिहिलेस हे बघून बरे वाटले. आता हे काम बरेच पुढे गेले आहे. जगभरच्या अनेकांनी हा माहितीपट पहिला. आता आम्ही ३ माहितीपटअन्ची मालिका बनवत आहोत. सोबतच्या लिंकवर कालच्या लोकसत्तेतला माझा एक लेख जोडतोय.
  तू तुझ्या ब्लोगवर हे लिहिणार नाहीस म्हणून मुद्दाम सांगू इच्छितो की विज्ञान आश्रमावरचा माहितीपट बनवण्यामध्ये तुझा महत्वाचा आर्थिक सहभाग होता. भेटूच. समीर शिपूरकर ९४२२० ८९३१०
  http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=47844:2010-02-14-16-24-28&catid=212:2009-08-18-16-27-53&Itemid=210

 2. Hi Niranjan,

  I have been hearing about you from Sameer. I really appreciate your efforts of writing about VA, the film and Lend-a-hand, India on your blog.

  However important it is to do a good work, more important is to share that work with as many people as possible.

  We all need to be a support of each other in this field. Also, please let us know, if we can be of any help to you.

  Thanks,
  Shilpa.

  1. शिल्पा,
   कोणी चांगले काम करत असेल तर त्याची दाखल ही घेतलीच पाहिजे, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचली पाहिजे. पण नुसती माहिती पोचवण्यापेक्षा, अशी कामे करणे फारच कठीण.
   -निरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s