अमेरिकन वैद्यकीय व्यवस्था


सध्या अमेरिकेत ओबामांच्या हेल्थ केअर प्लान बद्दल जोरात चर्चा चालू आहे त्या निमित्ताने हा लेख. अमेरिकेत आजारी पडण्यासारखी दुसरी महागडी गोष्ट नाही. ईन्शुरन्स असेल तर ठीक नाहीतर दिवाळंच निघायचे. नोकरदार वर्गाला कंपनीकडून तरी ग्रूप ईन्शुरन्स मिळतो. पण त्याचेही हफ्ते दर वर्षी महाग होऊ लागले आहेत. बरं, आणि ईन्शुरन्स आहे म्हणजे झाले असेही नाही. डॉक्टरने काही तपासण्या सांगितल्या की त्या योग्य होत्या की नाही हे बघून मग त्या कव्हर होतात की नाही हे ते सांगणार. आणि एखाद्याला दुर्धर आजार झाला असेल तर ईन्शुरन्स कव्हर एका मर्यादेच्या पुढे नाकारायला पण मागे पुढे पाहत नाहीत.  डॉक्टरच्या मागे सुद्धा एवढ्या procedural गोष्टी लावल्या आहेत की रोगनिदान करायचे की ह्यांची कारकुनी करायची असा डॉक्टरला प्रश्न. ओबामांचा प्लान ही ईन्शुरन्स ची मक्तेदारी आणि अरेरावी कमी करण्यास बराच उपयुक्त ठरणार आहे. आणि ह्यांची लॉबी मजबूत. म्हणूनच ओबामांच्या प्लान विरुद्ध जोरदार आरडा ओरडा चालू आहे.

अमेरिकेत वैद्यकीय सेवा महाग असायला बरीच कारणे आहेत. पण मुख्य म्हणजे तेथील कायदा व्यवस्था. डॉक्टरचे अगदी थोडी जरी चूक झाली तरी रोगी त्याच्यावर नुकसान भरपाईचा दावा घालणार. आणि ह्या दाव्याची रक्कम सुद्धा बरीच मोठी असते. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरला liability insurance  हा घ्यावाच लागतो. त्यामुळे डॉक्टरच्या फिया वाढतात. आणि उगाच खटला नको म्हणून डॉक्टर सुद्धा रोगनिदान पटकन करत नाहीत. ही टेस्ट करू, ती टेस्ट करू, बहुतेक नुसती सर्दी असेल, किंवा काही भयानक असेल अशी डॉक्टरची भाषा. त्यामुळे साहजिकच डॉक्टर आणि हॉस्पिटलचा खर्च जास्ती, आणि मग त्याचा बोजा रुग्णावर. असा सगळा मामला आहे.

अजून एक विचित्र गोष्ट आहे. प्रत्येक हॉस्पिटलची एक ER  सेवा असते. आता ER म्हणजे Emergency Response . पण कृपया नावावर जाऊ  नये. समजा, तुमचा हात मोडला आहे (देव करो आणि असे न होवो!), आणि रविवारचा दिवस आहे. म्हणजे डॉक्टरचा दवाखाना बंद. मग ER  मध्ये जाण्याशिवाय पर्यायाच नाही.  तिकडे डॉक्टरला दाखवून, प्लास्टर वगैरे होऊन बाहेर पडेपर्यंत २-३ तासांची निश्चिंती. कारण हात मोडलाय ही त्यांच्यासाठी emergency नाही. माझा स्वतःचाच अनुभव सांगतो. मध्ये मी कामा निमित्त दोन आठवडे बोस्टनला गेलो होतो. जायच्या आधी पायाला खरचटले होते. पण सतत बूट घातल्याने बोस्टनला पोहोचे पर्यंत जखम चिघळली. दुसऱ्या दिवशी मी कस्टमरच्या ऑफिस मध्ये जाईपर्यंत पाय ठणकू लागला. मी तिकडच्या receptionist ला जवळपास डॉक्टर कुठे आहे का विचारले तर तिने हॉस्पिटलचा पत्ता दिला. गेलो. ईन्शुरस वगैरे सोपस्कार झाल्यावर बसायला सांगितले. जास्त गर्दी दिसत नव्हती, वाटले पाउण तासात सुटका होईल. पण तब्बल तीन तास लागले माझा नंबर लागायला. डॉक्टरने मोजून दीड मिनिट पाहिलं आणि नर्सला बँडेज लावायला सांगून, एक पाच डॉलरचं औषध लिहून दिलं. त्यानंतर मी भारतात परतल्यावर चक्कं ८०० डॉलरचं बिल पाठवलं. नशीब कंपनीचा इन्शुरन्स होता.

आता ह्या उलट भारतात अनुभव. माझा पाय मोडला होता (होय परत पायच!) दिनानाथ मध्ये गेलो. तिकडली गर्दी पाहून वाटलं की २-३ तास लागणार. पण काय आश्चर्य, एका तासाच्या आत मी हॉस्पिटलच्या बाहेर. डॉक्टरांनी आपुलकीने चौकशी वगैरे केली. त्यात माझा एक मित्र दिनानाथला स्पेशालीस्ट. त्यामुळे तोही जातीने हजर होता. त्याच्या उपस्थिती मुळे नाही म्हटला तरी थोडी VIP  वागणूक मिळालीच. पण एकूणच अनुभव सुखद होता. त्या नंतर सुद्धा एक दोन वेळा हॉस्पिटलशी संबंध आला (त्याचे एक वेगळे पोस्ट लिहिणार आहे), आणि एकूणच ट्रीटमेंट चांगली होती.

एकूणच मला  भारतात डॉक्टर बरोबर जेव्हढे comfort feeling आले, ते अमेरिकेत काही अपवाद वगळता नाही आले. ह्याचा अर्थ असा नव्हे की  तेथील डॉक्टर कमी दर्ज्याचे आहेत. पण खरच ह्या इन्शुरन्स आणि नुकसान भरपाईच्या ओझ्याखाली दबून गेले आहेत. आणि म्हणतात ना “एकदा जीभ पोळली की मांजर  ताकही फुंकून फुंकून पिते” , त्यातलीच गत ही.

बाकी ह्या लेखाचा उद्देश अमेरिकन आणि भारतीय वैद्यकिय व्यवस्था ह्यातील फरक काढणे हा नाही. सहज मनात आले म्हणून लिहिले. बाकी भारतातील डॉक्टरचा एक जबर खटकणारा अनुभव होता, त्या बद्दल वेगळा लेख लवकरच लिहिणार आहे.

Advertisements

6 thoughts on “अमेरिकन वैद्यकीय व्यवस्था”

  1. मला वाटतं की कट प्रॅक्टीस जितकी भारतामधे चालते तितकी कुठेच चालत नसेल. परवाचीच गोष्टं. सौ,ला सर्दी ताप होता. दोन दिवस एका डॉक्टरचं औषध घेतलं. बरंवाटलं.. पण सारखी चक्कर येणं सुरु झालं. सौ,ची कन्या रास.. त्यामुळे पुन्हा सारखी चक्कर येते म्हणजे स्पॉंडीलायटीस तर नाही?? म्हणुन एका ऑर्थो कडे गेलो, त्याने एक्स रे काढुन काही झालेलं नाही म्हणुन सांगितलं, आणि सोबतंच इएन्टी कडे दाखवा म्हणुन सांगितलं. तिथे पण चेक केल्यावर एम आर आय करा असं सजेस्ट केलं गेलं. शेवटी पुन्हा पहिल्या डॉक्टरकडे गेलो, तर त्यानी कुठलंतरी बिपीची गोळी घ्यायला सांगितली.. आणि आता ठिक आहे.. भयानक अनुभव होता. अक्कलखाती १७ हजार जमा झाले.. आणि औषध काय ?? तर बिपी ची गोळी… 🙂

    1. बाप रे! खरच भयंकर अनुभव आहे हा! माझ्या नशिबाने अजून तरी ह्या चक्रव्युहात अडकलो नाही. बरेच डॉक्टर मित्र असल्यामुळे असेल कदाचित. चांगला डॉक्टर मिळणे खरच महत्त्वाचे आहे.

  2. अमेरिकेतल्या इन्शुरन्स आणि मेडिकल बिझनेस बद्दल अगदी योग्य माहिती सांगणारा लेख. आणि इथे डॉक्टर पण एवढे मेकॅनीकली वागतात ना की बस !!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s