मराठीचा वाद


आज पेपरमध्ये संघ आणि सेना ह्यांच्यात प्रान्तवादावर जुंपली असल्याचे वाचले आणि खरंच वाईट वाटले. भागवत म्हणतात की मुंबई सर्वांचीच आणि पंत म्हणतात की मुंबईवर पहिला हक्क मराठीचा. ह्यांचे म्हणणे आहे की मराठी भाषिकाला नोकरीत प्राधान्य हवे. खरंतर माझ्या स्वाभिमानी मराठी मनाला ही सेनेचे भूमिका पसंत नाही. हे म्हणजे लहान मुलं म्हणतात ना की “माझी बॅट आहे म्हणून माझी बॅटिंग पहिली” अशातली गत झाली नाही का? माझा जर माझ्या कर्तुत्त्वावर विश्वास असेल, तर ह्या प्रांतवादाच्या कुबड्यांची मला गरजच वाटता कामा नये. आंदोलन करायचेच झाले तर ते गुणवत्तेनुसार नोकरीच्या जागा भरण्यासाठी व्हायला नको का?

मराठी माणूस जेह्वा देशाबाहेर जावून कर्तुत्व गाजवतो तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो. ओबामांनी outsourcing च्या विरुद्ध गोष्टी केल्या की आपल्याला राग येतो. ऑस्ट्रेलियात भारतीयांवर होणारे हल्ले आपल्याला एवढे खुपतात की आपण ऑस्ट्रेलियातील खेळाडूंना भारतात खेळू न देण्याची भाषा करतो. आणि हेच आपण, बिहारी / भय्या लोकांना मुंबई बाहेर हाकलायची भाषा का बरे करतो? शेवटी मुंबई भारतातच आहे ना? जर कोणी सक्षम माणसाची नोकरी काढून स्वभाषिक माणसाला देत असेल तर ही घटना मुंबईतच काय, बिहार मध्ये झाली तरी त्याचा निषेध व्हायला हवा. पण जर एखादा स्वतःच्या कष्टाने एखादे काम करत असेल तर तो स्थानिक की नाही ही गोष्ट महत्त्वाची का बरं वाटते ह्यांना?

जर मराठी माणसाची पीछेहाट रोखायची असेल तर आंदोलने करण्यापेक्षा मराठी युवकाला नोकऱ्यांच्या स्पर्धेसाठी तयार करणे, स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी परवडेल असे शिक्षण पुरवणे, स्वस्तात भांडवल पुरवणे ह्या गोष्टी केल्या तर जास्त फायदा नाही का होणार? आणि आपण सर्वांनी व्यवहारात मराठीच वापरायचा कटाक्ष जर बाळगला तर परप्रांतीयाला नाईलाजाने मराठी शिकावे  नाही का लागणार? त्यासाठी कायदा / आंदोलने कशाला? मला ठावूक आहे, ह्या गोष्टी बोलायला सोप्या आणि करायला कठीण. पण उगाच हे विषमतेचे पुरस्करण नको वाटते.

स्थानिक पक्षांना खरच काही करावेसे वाटत असेल तर का नाही ते महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या प्रश्नांचा  पाठपुरावा करीत? बाकीची राज्ये प्रगती करत असताना महाराष्ट्रच मागे का ह्याचा का नाही विचार करत? जरा पैशाची हाव कमी करून परोपकारी कामे होतील ह्या कडे का नाही लक्ष देत? किती दिवस शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे नुसते पोवाडे गात बसायचे? त्यांची दूरदृष्टी, त्यांची सहिष्णूता, त्यांचे प्रजापालन, ह्या गोष्टींचे प्रत्यक्षात अनुकरण का नाही करीत?

Advertisements

10 thoughts on “मराठीचा वाद”

 1. आता इलेक्षन झालेलं आहे. तेंव्हा सगळ्याच पक्षांच्या दृष्टीने हा मुद्दा एकदम गौण ठरलेला आहे. इतक्या सडेतोड पणे मुद्दा मांडणारे तुम्ही पहिले ! नाहीतर असं काही लिहिलं म्हणजे तुम्ही मराठी द्वेष्टे म्हणुन तुमच्यावर पण शाब्दिक हल्ला होऊ शकतो.
  भारतियांना मिळणारी वागणुक. सर्वज्ञातच आहे. आजच्या लोकसत्ता मधला कुमार केतकरांचा अग्रलेख पण खुपच सुंदर आहे. वाचला नसेल तर जरुर वाचा. अतिशय सुंदर लिहिलंय त्यांनी. आता कुमार कॉंग्रेसवाले पण त्यांचं लिखाण मला आवडतं.
  दुर कशाला, कालच्या सारेगमप मधे दोन इतर भाषीक स्पर्धक अन एक मराठी.. तिथे पण भाषा वाद नेला त्यांनी.
  इथे एका ब्लॉगची लिंक देतोय.. बघा…http://blog.sureshchiplunkar.com/2010/02/zee-marathi-saregamapa-rahul-saxena.html

  1. महेंद्र,
   लिहिताना मला जरा भीती होतीच की माझ्यावर टीका होणार. मी देखील मराठीचा अभिमानी आहे. मी आणि माझी बायको दोघंही अगदी मॉल मध्ये सुद्धा इंग्रजी फाडणाऱ्या विक्रेत्यांशी मराठीतच बोलतो. पण भाषेचे भांडवल होताना नाही बघू शकत! केतकरांचा लेख वाचला नाही. आता वाचतो.

   सा रे ग म प च्या निकालान्बद्दल गेली बरीच वर्ष साशंक आहे मी. जास्ती खोलात शिरत नाही नाहीतर नको ती आफत ओढवून घायचो. एका वेळी एकच वादग्रस्त मुद्दा पुरे! 🙂

 2. लेख आवडला पण बिहारींची तुलना अमेरिकेत, ऑस्ट्रेलियात जाऊन राहणा-यांशी केली आहे ते खटकलं. बरेच जण अशी तुलना करतात. पण ते अप्रस्तुत आहे. का ते सांगतो. अमेरिकेत जाणारी लोकं अमेरिकन कंपन्यांनी बोलावलंय म्हणून जातात. (अजून जास्त एच-१ व्हिसा दिले पाहिजेत हे बिल गेट्सचं विधान आपण ऐकलंच असेल. ) व्यवस्थित व्हिसा घेऊन जातात आणि टॅक्स वगैरे भरून शांतपणे आणि व्यवस्थित राहतात. उगाच घाण, मस्ती, दंगा, मारामा-या वगैरे असलं काही करत नाहीत. आणि भैय्याचं बघा. सगळं याच्या उलट. न बोलावता येतात. घाण करतात. टॅक्स बिक्स चा तर काही संबंध नाहीच आणि उगाच मारामा-या, दंगली, खून या सगळ्या गोष्टींत पुढे. अतिशयोक्ती वाटत असेल पण खरं आहे ते. सध्याचे महाराष्ट्रातले चोरी, घरफोडी, खून, खंडण्या, बलात्कार कुठलेही गुन्हे बघा त्यात युपी आणि बिहारीच प्रामुख्याने आढळतात. अर्थात हे सगळं मी स्वत: अमेरिकेत आहे म्हणून म्हणतोय असं नाही. मी जरी भारतात असतो तरी माझं मत हेच असतं.

  1. हेरंब,सरसकट सगळे भैय्या लोक दंगा करतात असे म्हणणे मला तरी पटत नाही. मी मुंबईत बरीच वर्ष काढली पण भैय्यांनी दंग केलेला ऐकिवात नाही. आणि काही अपवाद असतील. चोऱ्या, दरोडे, खून ह्या गोष्टी प्रामुख्याने बेकारी मुळे होत आहेत. आता अमेरिकेत काळ्या लोकांचे गुन्ह्याचे प्रमाण जास्त आहे म्हणून सर्वच काळे वाईट नसतात. तसेच भैय्या समाजावरच दंगे करणारे असे लेबल लावणे मला पटत नाही.

   आणि जसे आपण भारतीय कायदेशीररीत्या परदेशात राहतो, (by the way, बरेच भारतीय लोक new jersey मध्ये अनधिकृत रीत्या राहत आहेत), तसेच हे बिहारी / भैय्ये पण कायदेशीर रित्याच मुंबईत आले आहेत ना? कृपया मला उत्तर भारतीयांचा कळवळा आहे असा गैरसमज नको.

 3. I think the comparison of Maharashtra and America is like comparing apples and oranges. The population is the important factor. US is three times larger than India and the population is three times smaller than india. They have proper law and VISA regulations and only 65000 skilled labors can enter per year. They can regulate the laws for the benifit of thier people and that is completely right. Also there are advantages in college (in case of tution fees) for local people in all the states. The same should happen in India. It should be like a united states of India instead of Republic of India (Also one obervation on the passport it says a republic of India but on drivers license it says Union of India—-I think the official name Republic of India though)

  1. Yesaji,

   I am not comparing US with India. All I am trying to say is that when our people feel resistance in other countries we feel bad (which is natural). But when it comes to our own locality, we are expressing same resistance. Why can’t we just believe in “equal opportunity” for all?

   Regarding discounts to states residents in tuition fees, its not applicable just to the state born citizens. Any resident spending over 1 year gets the discount. And there is a rationale for the same. The state resident (or his parents) pays tax to that state, hence he is eligible for lower tuition fees. I lived in US for 10 years, and my wife availed such discount for a small university course even when she was on H4 that time. hence this knowledge 🙂

 4. मुळlत या सगळया अडचणी उद्भवण्यlलl एकच कारण आहे ते म्हणजे लोकसंख्या. आपण हा प्रश्न सोडवला तर जग जिंकू. सगळया लोकांनी उठुन महाराष्ट्रातच यायला हवे असे नाही… जास्त लोकसंख्या ईथे खुप problems creat करत आहे. प्रत्येक राज्यात योग्य संधी असल्या पाहिजेत.

  जरा पैशाची हाव कमी करून परोपकारी कामे होतील ह्या कडे का नाही लक्ष देत? किती दिवस शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे नुसते पोवाडे गात बसायचे? त्यांची दूरदृष्टी, त्यांची सहिष्णूता, त्यांचे प्रजापालन, ह्या गोष्टींचे प्रत्यक्षात अनुकरण का नाही करीत?

  हे पटले.

  1. लोकसंख्यावाढ ही मोठी समस्या आहे खरी. प्रत्येक राज्यात संधी मिळाल्या पाहिजेत हे १००% पटले. माझ्या नरेंद्र मोदींच्या लेखाला प्रतिक्रिया देताना मीनाक्षी ने गुजरातमध्ये लोक खेड्यात शेती करायला परत जात आहेत त्याबद्दल उल्लेख केला होता. गुजरात मॉडेल बहुतांशी प्रमाणात अवलंबले तर खरच फार छान होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s