मुखपृष्ठ > ब्लोग्गिंग > नर्मदेऽऽहर आणि अध्यात्मिक गुरु

नर्मदेऽऽहर आणि अध्यात्मिक गुरु


आजच पेपरात बातमी वाचली कि श्री जगन्नाथ कुंटे ह्यांच्या नर्मदेऽऽहर पुस्तकाची १०वी आवृत्ती प्रकाशित होत आहे. श्री कुंटे ह्यांनी अजून तीन पुस्तके लिहिली आहेत. त्यातील कालिंदी आणि साधनामस्त ही पुस्तके आणि अर्थात नर्मदेऽऽहर हे पुस्तक, अशी तिन्ही पुस्तके मी एका वर्षाच्या आत वाचली. आता मी कुंटे ह्यांचा चाहता झालो आहे. त्यांची अगदी सहज सुलभ लेखन शैली आणि प्रांजळपणा ह्या दोन गोष्टी खूप भावल्या. कुंटे स्वामी कुठेही आपण आध्यात्मिक गुरु असल्याचा आव आणीत नाहीत पण त्यांची ही पुस्तके वाचली की त्यांच्या आध्यात्मिक खोलीची कल्पना येते. परिक्रमेतसुद्धा त्यांच्या पुढे गुरुपद, महन्तपद वगैरे स्वीकारायची एवढी प्रलोभने आली, पण जेव्हा केव्हा “कम्फर्ट झोन” येतोय असे वाटले, तेव्हा तेव्हा स्वामी तिकडून पळून गेले. एखादा साधा शिष्य पण गुरु बनवून घ्यायला आला असे दिसले तर स्वामी त्याच्यापासून पळून जात. मोठेपणा पायाशी लोळायला येत असताना असे त्याला झिडकारून कफल्लक जीवन पत्करणे खरच किती कठीण आहे, पण ह्या गृहस्थाने (आता गृहस्थ हा शब्द चूक आहे, कारण स्वामींनी दीक्षा घेतली आहे, तेव्हा ह्या बैराग्याने), किती सहजगत्या सर्व मान मरातब धुडकावून, देहाला आत्यंतिक यातन होत असताना सुद्धा नर्मदेची खडतर परिक्रमा एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळा पार पाडली. खरच धन्य आहे. प्रत्येक मराठी माणसाने वाचावे अशी ह्यांची पुस्तके आहेत. इतर वाचकांचे माहित नाही, पण कुंटे स्वामींची पुस्तके वाचल्यावर मला माझ्या वागण्यात सूक्ष्म का होईना पण फरक जाणवला.

तर आजची बातमी वाचल्यावर साहजिकच इतर अध्यात्मिक गुरुंबद्दल डोक्यात विचार आले. तसं पाहिलं तर मी काही खूप भाविक, देव देव करण्यातला मुळीच नाही. हे गुरु वगैरे तर दूरचीच गोष्ट. पण तरीही नातेवाईक, ओळखीतील लोक ह्यांच्या सांगण्यावरून अधून मधून वेगवेगळ्या गुरुंबाबतमाहिती झाली. लहान असताना श्री पांडुरंग शास्त्री आठवले ह्यांचे तत्त्वज्ञान हे पुस्तक घरी यायचे. अत्यंत साधेपणे लिहिलेले ते पुस्तक, पण त्या वेळी डोक्यावरून जायचे. पण नंतर मी अमेरिकेत असताना माझा एक मेहुल नावाचा भाडेकरू होता. तो ह्यांचा अनुयायी. तिकडे अमेरिकेत हा पठ्ठ्या नित्यनेमाने स्वाध्यायाचे पालन करायचा. मला श्री आठवले ह्यांच्याबद्दल किंवा स्वाध्यायाबद्दल पण विशेष माहित नव्हते. पण एक गोष्ट जाणवली की त्यांचा शिष्य परिवार एवढा मोठा होता, पण कोठेही जास्त गाजावाजा नाही. आणि त्यांच्या एकूणच आचार विचारात प्रचंड शिस्तबद्धता होती. पण खेदाची बाब ही की आठवले गुरुजींचे निवर्तन झाल्यावर त्यांच्या वारसाबद्दल काही वाद निर्माण झाला होता. आता सध्या हा स्वाध्याय कसा चालला आहे कोण जाणे.

मी पुण्याला माझ्या मावशीकडे शिकायला असताना एक स्वामी यायचे. रामदासस्वामींचे हे भक्त. इंजिनिअर होते, पण तरुणपणीच संन्यास घेतला होता आणि शिवथर घळीच्या जवळ राहयचे. माझी मावशी आणि तिचे पती हे दोघंही दान करण्यात आघाडीवर. तेव्हा त्या निमित्ताने स्वामीजींचे येणेजाणे होते. फार मोठ्या आवाजात बोलायचे. ह्यांना म्हणे समर्थ दिसायचे आणि समार्थांशी ह्यांचा म्हणे संवाद असायचा. माझा काही विश्वास बसत नसे. मी त्यांना खोदून खोदून विचारायचो की समर्थ दिसतात ते केव्हा, कुठे, आणि मला का नाही दिसत? ते खरं तर वैतागायचे पण तुझी अध्यात्मिक पातळी तेवढी नाही असं काहीबाही सांगून वेळ मारून न्यायचे. मला गम्मत एका गोष्टीची वाटायची की हा संन्यासी माणूस. म्हणजे ह्याला आसक्ती नसावी ही अपेक्षा. पण कधीही मावशीच्या घरी आले की जेवणाच्या पदार्थांची फर्माईश असायची! बहुतेक अधूनमधून संन्याशाश्रामातून गृहस्थाश्रमात प्रवेश करत असावेत!

अमेरिकेत असताना एकदा माझे आई वडील आले होते, त्याच दरम्यान एका प्रख्यात international गुरूंचे New Jersey मध्ये प्रवचन का काहीतरी होते. माझ्या आई वडिलांनी मुंबईत ह्या गुरूंच्या प्राणायाम पद्धतीचा क्लास घेतला होता. तेव्हा वडलांच्या ईच्छेवरून आम्ही सर्वजण New Jersey ला ह्यांच्या प्रवचन का मेळावा त्याला गेलो होतो. गम्मत म्हणजे आयोजकांनी जाहिरात करताना सांगितले होते की मेळावा फुकट आहे. पण तिकडे गेलो तर प्रवेशद्वारापाशीच आयोजकांचे प्रतिनिधी TICKET अशी पाटी लावून बसले होते. साहजिकच कोणालाही वाटेल की कार्यक्रमाला प्रवेश फी आहे. त्यामुळे सर्वांनी ही तथाकथित तिकिटे घेतली. (नंतर कळले की तिकीट घेणे बांधील नव्हते. मग का बरे असा चावटपणा? जाऊदे!) आत गेल्यावर पहिले तर व्यासपीठावर तबला पेटी वगैरे साहित्य होते आणि काही देशी आणि काही गोरे असा शिष्यसमुदाय होता. एका गोऱ्या स्त्री ने अत्यंत बेसूर अश्या आवाजात “रघुपती राघव” हे भजन सुरु केले आणि खरं सांगतो, मला पु. ल. देशपांड्यांचा “काय म्हणाले गुरुदेव?” हा लेख आठवला. त्या दिवशी मी मनापासून वंदन केले; गुरुदेवांना नाही, पुलंना! नंतरचे सर्व प्रसंग पुलंनी लिहिल्या प्रमाणेच घडले. तसेच गुरुदेवांचे आगमन, बेसूर गाण्यावर गुरुदेवांना तंद्री (की समाधी? कोण जाणे!) लागली, मग गुरुदेवांचे अगदी तस्सेच भाषण! मग एकत्रित डोळे मिटून ध्यान करणे. माझ्या आजूबाजूच्या सर्वांनी डोळे मिटले. मी मात्र हळूच डोळे उघडून आजू बाजूला बघत होतो. का कुणास ठावूक मला मात्र फार हसू येत होते. मला एक गोष्ट राहून राहून वाटत होती की हे स्वतःला गुरुदेव म्हणवून घेतात, कपडे मात्र आगदी साधे वापरतात, पण भारतात एवढी गरिबी, गांजलेपण असताना, ह्यांना परदेशातील लोकांच्या उद्धाराचा का बरं एवढा कळवळा? असे ऐकले की ह्यांचा स्वतःचा Lake Taho ला आश्रम आहे! जाऊदे माझी आध्यात्मिक पातळी खूपच खालची आहे. असो.

त्यातल्या त्यात मला आपले रामदेव बाबा मात्र खूप आवडतात. म्हणजे मी त्यांचा शिष्य वगैरे आजिबात नाही बरं? पण ह्या बाबांनी एकाच ध्यास घेतला आहे तो योग सामान्य जनतेपर्यंत पोचवायचा आणि ते काम मात्र छान करतायत. आणि कधीही घरात बोर होत असेल किंवा मूड खराब असेल तर चक्क मी आस्था चॅनल लावतो. अहो आत्मिक शांतीसाठी नाही, पण रामदेव बाबाचे प्रवचन बघायला. त्यांचे हावभाव, भक्तांना दटावणे खूप विनोदी वाटते मला. त्यांचे प्रवचन पहिले आणि हसत सुटलो नाही असे कधी झाले नाही!

Advertisements
 1. abhinay
  जानेवारी 30, 2010 येथे 5:18 pm

  मस्त लेख. लेखनशैलीही छान. बाकी बाबा-बुवा आणि तथाकथित संतांचे खरे रूप मी नाशिक-त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा कव्हर केला, त्यावेळी खूप जवळून पाहिले. तुमच्या निमित्ताने ते सारे आठवले. आता वाटते की ती सारे रूपे लेखनात उतरवावी.

  नर्मदा या विषयासंदर्भात मलाही खूप आस्था आहे. सध्या इंदूरमध्ये वास्तव्य असल्याने नर्मदामय्याचे दर्शन अधून मधून होते. ही नदी मोठी विलक्षण आहे. भारती ठाकूर या माझ्या परिचितांनी तिची परिक्रमा नुकतीच केली. त्यावर त्यांनीही पुस्तक लिहिले आहे. त्याचा परिचय येथे माझ्या पत्नीने करून दिला आहे.

  http://marathi.webdunia.com/miscellaneous/literature/bookreview/0909/11/1090911045_1.htm

  • जानेवारी 30, 2010 येथे 6:07 pm

   अभिनय, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! कुंटे स्वामींचे पुस्तक वाचल्यापासून तर नर्मदा परिक्रमेबद्दल फारच आकर्षण निर्माण झाले आहे. भारती ताईंच्या परिक्रमेबद्दल ऐकले आहे. त्यांचे पुस्तक पण वाचायचा संकल्प आहे.

   -निरंजन

 2. फेब्रुवारी 2, 2010 येथे 1:48 सकाळी

  अप्रतिम लेख. मलाही त्या बाबा आणि बुवांचा तिटकाराच आहे. बाकी “नर्मदे हर” बद्दल बरंच ऐकलंय. पण वाचायचा योग नाही आला अजून. लवकरच वाचेन.

  • फेब्रुवारी 2, 2010 येथे 10:56 सकाळी

   जरूर वाचा हे पुस्तक. माझ्यासाठी तरी ते inspirational आहे.

 3. june
  जून 3, 2010 येथे 9:18 pm

  narmade har har & others book is very good for not only read they teach to who am i 7 what i do .shri. jagnaath kunte is my guru. thanks to my boss who met me my guru.

  • जून 11, 2010 येथे 6:04 pm

   चैतन्य,

   प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद!

 4. सप्टेंबर 21, 2010 येथे 1:37 pm

  very good

  • सप्टेंबर 22, 2010 येथे 10:28 pm

   धन्यवाद! ब्लॉग वर आपले स्वागत आहें!

 5. Hansraj
  जानेवारी 31, 2011 येथे 4:49 pm

  Chan Zalay lekh

  Agree( इतर वाचकांचे माहित नाही, पण कुंटे स्वामींची पुस्तके वाचल्यावर मला माझ्या वागण्यात सूक्ष्म का होईना पण फरक जाणवला.)
  malhi thodafar swatat badal karavasa vatla

 6. Ganesh.
  जून 10, 2011 येथे 7:19 pm

  Tumcha Lekh changla aahe.

  Pandurang shashtri che karya (Swadhyaya Karya) Khup changlay aani sadhya method ne chalu aahe.

  Dhanyawad!

 7. Atul Sahaje
  डिसेंबर 7, 2011 येथे 8:08 pm

  Farach sunder pustak aahe. vishesh Mhanje aapan sarva lok kithi aahankari aahot. yachi veloveli aathvan hote

  • डिसेंबर 9, 2011 येथे 1:59 pm

   अतुल, खरं आहे आपलं म्हणणं

   प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद!

 8. mukund
  डिसेंबर 9, 2011 येथे 7:50 pm

  shriram……….

  I am join the holi narmada maiyya parikarma on 30/01/2012 from
  shri amarkantak ……..mukund

  • डिसेंबर 18, 2011 येथे 9:36 सकाळी

   नमस्कार! आपल्या परिक्रमेला हार्दिक शुभेच्छा!

 9. mukund
  मे 8, 2012 येथे 8:01 pm

  shriram…….narmade har
  my narmada parikrama was completed by Mata Narmada by us w.e.f. 02/04/2012 to 21/4/2012 ……with greet & very best experience ………mukund from dhule-mh-18 .

 10. nitin
  जुलै 18, 2012 येथे 5:31 pm

  narmade har

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: